शिवभूमी १२ मावळ - सफर इतिहासाची

बारा मावळ प्रांत

बारा मावळ प्रांत

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना बारा मावळे एकत्र करून केली . या डोंगराळ मावळ प्रांतची सिमा दक्षिणेकडे रायरेश्वराचे पठार ते उत्तरेकडे राजमाची किल्ला परिसर , पश्चिमेकडे अभेद्य जावळीचे खोरे, कोकण प्रदेश आणि पूर्वेकडे सपाट पुणे परगणा अशी आहे. या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत .

या प्रांतात वाहणाऱ्या नद्या , उपनद्या , किल्ल्यांच्या अथवा गावांच्या नावावरून हा प्रदेश ओळखला जातो .या प्रांतात मुख्य बारा मावळ असून 18 महाल व 36 नेरे होते. या भूप्रदेशाला अथांग असा ऐतिहासिक , भोगोलिक , व लढाऊ वारसा लाभलेला आहे .शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खळदबेलसर लढाई , सुभानमंगळ लढाई, प्रतापगड रणसंग्राम, सुरतेची लुट , पावनखिंड रणसंग्राम , शाहिस्तेखानावरील छापा , सुरतेची लुट , अशा अनेक इतिहास प्रसिद्ध प्रसंगात बारा मावळभागाने पराक्रम गाजवला आहे ., आशा या लढाऊ भागाचे भौगोलिक विवेचन होत आहे.

  • 1 ) रोहिड खोरे - रोहिडा किल्ल्याच्या परिसरातील या भागाला रोहिडे खोरे म्हणतात त्याच्या दोन तराफा होत्या . कारी तरफ व उतरवली तरफ . या भागातून निरा नदी वाहते . ( सध्या ता. भोर ) कारी तरफ या भागात रायरेश्वर , केंजळगड , रोहिडा किल्ला , आंबवडे , कारी , पानवहाळ , इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे व गावे आहेत. या खोऱ्यातील उतरवली तरफ भागात भोर उतरवली आदी ऐतिहासिक गावे होती.या मावळात 42 गावे होती . या भागात मांढरदेव घाट आहे .
  • 2 ) हिरडस मावळ :- हिरडोशी या गावावरून या मावळाला हिरडस मावळ म्हणतात या मावळात 52 गावे होती . मावळातील काही काही भाग हा निरा नदीच्या खोऱ्यात येतो . या मावळात महुडे , शिंद , संगमनेर , आळंदे , आदि ऐतिहासिक गावे आहेत या मावळात कासलोस गड उर्फ मोहनगड , किल्ला आहे - वरंधा घाट आहे.
  • 3 ) वेळवंड खोरे :- वेळवंडी नदीच्या खोऱ्यात हे मावळ वसले आहे . या भागात हर्णस , पसुरे , करंदीकांबरे , तळे मशिवली , लव्हेरी , जोगवडी आदी ऐतिहासिक गावे आहेत. या मावळात 33 गावे आहेत.
  • 4 ) गुंजनमावळ :- गुंजवणी नदीच्या खोऱ्यात हे मावळ वसलेले आहे . या मावळात 83 गावे आहेत , या मावळात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे . या मावळात गुंजवणे , पालदेव , आंबवणे , बोरावळे , कुरुंगवाडी आदी ऐतिहासिक गावे वसलेली आहेत. या मावळात शेवता घाट व मढे घाट आहे.
  • 5) कानद खोरे:- हे मावळ कानंद नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे . या मावळात 33 गावे आहेत. या मावळात तोरणा उर्फ प्रचंडगड हा किल्ला आहे. या मावळात कानंद , भट्टी , पाबे , विंझर , धानेप कोंढावळे , चापटे आदी ऐतिहासिक गावे आहेत.
  • 6) मोसे खोरे :- हे मावळ मोसे नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. या मावळात 71 गावे आहेत. या मावळात , तव , निगडे-मोसे , शिरकोली आदी ऐतिहासिक गावे आहेत . या भागात कुंभा , कावळ्या देव आदी घाट आहेत .
  • 7 ) मुठे खोरे :- हे मावळ मुठा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे , 19 गावे होती , या मावळात आंदगाव , मुठा ही ऐतिहासिक गावे आहेत .
  • 8 ) पौड खोरे :- हे मावळ मुळा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे , पौड खोऱ्यात 3 तरफ होत्या गिर्हे तरफ , तामणखोरे तरफ , कोर बारसे तरफ , या मावळात 82 गावे होती . या मावळात घनगड व कोरीगड ( कुवरीगड ) हे दोन किल्ले होते. या मावळात ताम्हिणी घाट लेंडीघाट , वाघजाई घाट , गाढवलोट घाट आहेत.
  • 9 ) पवन मावळ :- हे मावळ पवना नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे . या मावळात 80 गावे आहेत. या मावळात बेबडओव्हळ , शिंदगाव आदी ऐतिहासिक गावे आहेत या मावळात तुंग-तिकोणा किल्ले आहेत.
  • 10) नाने मावळ :- हे मावळ इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. या मावळा 89 गावे आहेत . या मावळा , नाणे , टाकवे , कार्ले आदी ऐतिहासिक गावे आहेत. या मावळात बोरघाट व कुरंवडी आदी घाट आहेत . या मावळात राजमाची , लोहगड , विसापूर , आदी किल्ले आहेत.
  • 11 ) खेडेबारे मावळ:- हे मावळ शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत . या मावळात 42 गावे आहेत. खेड शिवापूर , रांझे , कोंढानपूर , कल्याण , कापूरहोळ आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत . या मावळात सिंहगड किल्ला आहे.
  • 12) कर्यात मावळ :- ही पुणे परगण्याची एक तरफ आहे ., कर्या म्हणजे खेडेगाव, कर्यात मावळ म्हणजे मावळची खेडी. या मावळात 36 गावे होती . या मावळात खामगाव मावळ , आगळंबे , मांडवी , आदी ऐतिहासिक गावे आहेत. तसेच पुणे परगण्याच करेपठार , जेजुरी , सासवड ,पांगारी , नारायनपेठ आदी ऐतिहासिक गावी आहेत. पुरंदर किल्ला या परिसरात आहे.

शिवकालीन 12 मावळातील व पुणे परगण्यातील सरदार , सरनौबत, किल्लेदार, प्रधान, मावळे, तटसरनौबत
  • 1. येसाजी कंक , कोंडाजी कंक
  • 2. कान्होजी जेधे , बाजी सर्जेराव जेधे , नागोजी व चांदजी जेधे
  • 3. कोयाजी बांदल , रायाजी बांदल , बाजी बांदल
  • 4. झुंझारराव मरळ
  • 5. हैबतराव शिळीमकर
  • 6. तुकोजी , भैरव, भिकाजी चोर
  • 7. पिलाजी सणस
  • 8. कान्होजी कोंडे
  • 9. चांगोजी व तुकोजी कडू
  • 10. बाळाजी शिवतरे
  • 11. जिवाजी महाले
  • 12. पिलाजी गोळे
  • 13. कावजी कोंढाळकर
  • 14. कोंडाजी , बकाजी व महादजी फर्जंद
  • 15. रामजी पांगारे
  • 16. बाजी पासलकर
  • 17. नागोजी कोकाटे
  • 18. शामराज रांझेकर
  • 19. सूर्याजी काकडे
  • 20. संताजी बोबडे
  • 21. कृष्णाजी बंकी गायकवाड
  • 22. सिदोजी पोळ
  • 23. संभाजी गरुड
  • 24. जैताजी करांजवणे
  • 25. चाहुजी मारणे
  • 26. अरजोजी ढमाले
  • 27. बापूजी मांढरे
  • 28. हरजी दामगुडे
  • 29. बहिर्जी वाडघरे
  • 30. हिरोजी तनपुरा मराठे
  • 31. राम व भिकाजी दळवी
  • 32. कोंडाजी वडखले ( वडखडे )
  • 33. बाजी घोलप
  • 34. विठोजी लाड व इंद्रोजी गाडे
  • 35. बाजीप्रभू देशपांडे
  • 36. येसाजी व बाळाजी दरेकर
  • 37. गोदाजी जगताप
  • 38. रामजी व सूर्याजी काकडे
  • 39. नरसोजी शितोळे
  • 40. रामजी मोरे
  • 41. पंताजी बोकील
  • 42. रामजी ढमाले
  • 43. वाघोजी तुपे
  • 44. तानाजी व सूर्याजी मालुसरे
  • 45. हिरोजी शेळके
  • 46. कोंडाजी वरखडे
  • 47. जावजी पारठे
  • 48. बापूजी मांढरे
  • 49. चिमणाजी बापूजी देशपांडे
  • 50. कान्होजी भांडवलकर
  • 51. विठोजी लाड
  • 52. इंद्रोजी गावडे
  • 53. पायगुडे
  • 54. रामजी मोरे
  • 55. महादजी फर्जंद भोसले
  • 56. शिवाजी इंगळे
  • 57. भिमाजी वाघ

रोहिड खोरे
हिरडस मावळ
वेळवंड खोरे
गुंजन मावळ
कानद खोरे
मोसे खोरे
मुठे खोरे
पौड खोरे
पवन मावळ
नाने मावळ
खेडेबारे मावळ
कर्यात मावळ
रोहिड खोरे
हिरडस मावळ
वेळवंड खोरे
गुंजन मावळ
कानद खोरे
मोसे खोरे
मुठे खोरे
पौड खोरे
पवन मावळ
नाने मावळ
खेडेबारे मावळ
कर्यात मावळ